Arogya Ayuktalay Thane Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, आरोग्य सेवा आयुक्तालय ठाणे या अंतर्गत पदांची भरती निघालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत, पगार तब्बल 40 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे.
आरोग्य सेवांमध्ये तुम्हाला नोकरी करायचे असेल तरी ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आरोग्य सेवा आयुक्त ठाणे भरती 2024 अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होत ? पात्र आणि इच्छुक उमेदवार या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करू शकणार आहेत.
आरोग्यसेवा आयुक्तालय तसेच राज्य आरोग्य सोसायटी मुंबई महाराष्ट्र या अंतर्गत द नॅशनल टेलीमेंटल हेल्थ प्रोग्राम ‘टेलीमानस’ या अंतर्गत ही भरती आणि या पदांची भरती केली जाणार आहे. आता यामध्ये कोण कोणती पदे ? आणि भरतीची शैक्षणिक पात्रता, पदसंख्या, नोकरी ठिकाण, व पगार इत्यादी माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
भरती विभाग : आरोग्य सेवा आयुक्तालय ठाणे
पदांचे नाव : वरिष्ठ निवासी कन्सल्टंट, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, कौन्सिलर या पदांची भरती होत आहे.
पद संख्या : एकूण 07 जागांसाठी वरील पदांवर भरती होत आहेत.
शैक्षणिक पात्रता : वरील पदांकरिता शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, पदांसाठी कमीत कमी संबंधित विषयांमध्ये पदवी धारण केलेली असणं आवश्यक आहे, सोबतच पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. वरील काही पदांसाठी पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली देण्यात आलेली जाहिरात वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करावा. जेणेकरून कोणती अडचण येणार नाही.
ही भरती वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत विविध पदांवर भरती सुरू संधी सोडू नका !
वयोमर्यादा : वरील पदांसाठीची भरती प्रक्रिया होत असताना यामध्ये वरिष्ठ निवासी कन्सल्टंट पदासाठी वयोमर्यादा 61 वर्षापर्यंत आहे. कौन्सिलर या पदासाठी 59 वर्ष, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 आहे. मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्षेपर्यंत सूट (मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी)
पगार दरमहा : आरोग्य आयुक्तालय ठाणे अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी कोणत्या पदासाठी किती पगार आहे ? याची डिटेल्स खाली देण्यात आली आहेत. कौन्सिलर या पदासाठी 35 हजार रुपये दरमहा पगार, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर या पदासाठी 40 हजार रुपये दरमहा पगार, तसेच वरिष्ठ निवासी कन्सल्टंट या पदासाठी 1 लाख रुपये पर्यंतचा पगार दरमहा मानधन आता या ठिकाणी पाहायला गेलं तर शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा हे आपण जाणून घेतले पगार किती ? आता जाणून घेऊया.
आरोग्य आयुक्तालय ठाणे भरती 2024 अंतर्गत अर्ज कसा करायचा ?
- जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या प्रिंट आऊट काढून घ्या
- त्यानंतर त्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर ते माहिती भरा
- यासोबत आवश्यक असलेले कागदपत्रे जोडून खाली देण्यात
- आलेल्या पत्त्यावरती सादर करायचा आहे.
आरोग्य सेवा ठाणे भरती निवड प्रक्रिया कशी ?
प्राप्त झालेल्या अर्जा नुसार सर्व अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांना मुलखतीसाठी बोलवण्यात येणार आहे, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ही भरती वाचा : 12वी पासवर मुंबई महानगरपालिकेत या पदांवर भरती पगार 90 हजारापर्यंत त्वरित भरा फॉर्म ! अर्जाची ही शेवटची तारीख !
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदांसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठी खाली जाहिरातीमध्ये मूळ पीडीएफ, अर्ज नमुना हा दिला आहे, तो डाउनलोड करून तुम्ही अर्ज सादर करू शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ निवासी कन्सल्टंट, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, कौन्सिलर या पदासाठी अर्ज पाठवायचा असेल तर तुम्हाला, रीजनल मेंटल हॉस्पिटल, ज्ञानसाधना कॉलेज जवळ, एलबीएस रोड वागळे इस्टेट, ठाणे वेस्ट – 4000604 या पत्त्यांवर तुम्हाला अर्ज 02 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेच्या आत पाठवयाचे आहेत.
अर्ज नमुना पीडीएफ | येथे क्लिक करा |
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै पासून हे अर्ज सुरू झाले 02 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे अर्ज सुरू होणार आहे.
वरील पदासाठी तुम्ही पात्र असाल इच्छुक असाल तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठीची संपूर्ण माहिती आणि मूळ पीडीएफ जाहिरात ही खाली देण्यात आली आहेत.