मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी महत्त्वाची भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे. जनता शिक्षण संस्थे अंतर्गत शिक्षक लिपिक आणि सेवक या पदासाठी पात्र असलेल्या दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.
अर्ज करण्यासाठी या ठिकाणी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. जनता शिक्षण संस्थेच्या विविध शाखेमध्ये अनुदानित, विनाअनुदानित, कायम प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागांमध्ये शिक्षक, लिपिक, सेवक, आणि इतर रिक्त असलेल्या पदाची भरती केली जात आहे.
भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीचे जाहिरात जनता शिक्षण संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे, हे भरतीच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी भरती विभाग पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्दत, भरती कालावधी, नोकरी ठिकाण, पदसंख्या, अर्जाची शेवटची तारीख, अर्ज पाठवण्याचा पत्ता, इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहेत.
भरती विभाग :- जनता शिक्षण संस्था
पदाचे नाव :- सेवक, लिपिक, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी इतर भरती
शैक्षणिक पात्रता :- दहावी, बारावी व पदवीधर ( मूळ जाहिरात वाचा)
अर्ज पद्धत :- ऑफलाईन
भरती कालावधी :- पदाची निवड तात्पुरती स्वरूपाची व हंगामी स्वरूपाची
शैक्षणिक पात्रता :- शिक्षक :- बीए, एमएम, बीएससी, बी.एड, लिपिक :- बीकॉम, बीए, सेवक :- एसएससी, एचएससी, (दहावी बारावी उत्तीर्ण)
पदसंख्या :- 51 रिक्त जागा
हे पण वाचा :- फक्त 10 वी पासवर कॉम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन पदांची भरती त्वरित अर्ज करा !
नोकरी ठिकाण :- पुणे महाराष्ट्र
सूचना :- सर्व पात्र इच्छुक उमेदवार आणि छापील अर्ज संस्था कार्यालयातुन घेऊन अर्ज दिनांक 08/06/2024 पर्यंत कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावे.
मुलाखतीत दिनांक :- 12/06/ 2024 रोजी 9 ते 5 जनता शिक्षण संस्था पुणे – 12 द्वारे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी.टी पाटील महाविद्यालय दापोडी पुणे-12 येथे स्वखर्चाने उपस्थित राहणे गरजेचे आहे.
अर्जाची शेवटची तारीख :- 6 जून 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- जाहिरात दिलेल्या संबंधित पत्त्यावर
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
या जनता शिक्षण संस्था अंतर्गत होत असलेल्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. हे भरतीची जाहिरात वाचून घेतल्यानंतरच अर्ज करावे. आणि मुलाखतीस हजर राहावे धन्यवाद.