Jaticha Dakhla Documents List in Marathi | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

तुम्ही ओबीसी, VJNT, एसटी, किंवा एससी विद्यार्थी असाल तुम्हाला Jaticha Dakhla Documents List in Marathi काढायचे असेल तर कोणत्या जातीचे सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.

आज या लेखामध्ये कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे ? याचे संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

शासकीय कामे असो किंवा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेणे असो किंवा स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी जातीचा दाखला हा लागत असतो.

Jaticha Dakhla Documents List in Marathi / जातीचा दाखला म्हणजे नेमकी काय ?

शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची फार गरज असते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नेमकी जातीचा दाखला म्हणजे काय ? हा जातीचा दाखला म्हणजे काय हे खाली जाणून घेऊया.

तुम्ही ज्या प्रवर्गातील आहात त्या प्रवर्गातील प्रमाणित करण्यासाठी सरकारी दस्तावेज म्हणजेच जातीचा दाखला आहे. सरकारी दस्तावेज म्हणजे त्यात आपल्या कास्ट चा उल्लेख असतो.

दस्तर दर्शवते की तुम्ही खरंच या जातीचे आहात त्यालाच जातीचा दाखला म्हणून म्हटलं जतं. जातीचा दाखला किंवा प्रवर्ग सिद्ध करणारा किंवा प्रामाणिक करणारा सरकारी कागद म्हणजे जातीचा दाखला आहे.

महाराष्ट्रात किती प्रवर्ग ज्यांना जातीचा दाखला दिला जातो ?

हे तुम्हाला माहिती असणे तितकंच गरजेचं आहे. महाराष्ट्र मध्ये एसटी, एससी, एनटी, एसबीसी, ओबीसी, असे 5 जातीचे प्रवर्ग आहेत.

त्यांना या ठिकाणी जातीचा दाखला महाराष्ट्र राज्य मध्ये दिला जातो. परंतु केंद्रात NT, SBC, ओबीसी यासाठी सेंट्रल ओबीसी प्रमाणपत्र किंवा सेंट्रल का सर्टिफिकेट याला म्हणतो ते दिले जात.

हे पण वाचा :- ग्रामसेवक भरतीची तयारी कशी करावी पात्रता कागदपत्रे अभ्यासक्रम पगार संपूर्ण माहिती वाचा

जातीचा दाखला महाराष्ट्रात कसा काढावा ?

Jaticha Dakhla Documents List in Marathi

महाराष्ट्रात वरील 5 जातींसाठी Caste सर्टिफिकेट सध्या दिल जात आहे. महाराष्ट्र शासनाने आपले सरकार पोर्टलवर किंवा सेतू कार्यालय मध्ये ऑनलाईन प्रणाली द्वारे Caste सर्टिफिकेट काढण्यासाठी सुविधा दिलेल्या आहे.

तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुमचे कास्ट सर्टिफिकेट हे ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. किंवा महाराष्ट्र शासनाची अधिकृत आपले सरकार वेबसाईट यावर सुद्धा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट साठी अर्ज करता येतो.

कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी ही वेगवेगळी आहे. आता ही कागदपत्रे कोणकोणती आहेत याची लिस्ट तुम्हाला खाली देण्यात आलेले आहे.

जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लिस्ट ?

खाली दिलेली कागदपत्रे ओबीसी, एसटी, एससी, एसबीसी, या कॅटेगिरीसाठी एकच आहे. पण त्यामध्ये स्वतःचे शाळा सोडल्याचा दाखला, आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.

आजोबांची LC यावर जातीचा उल्लेख सारखा पाहिजे जर यामध्ये तफावत आढळली तर अजून खालील कॅटेगिरी नुसार तुम्हाला आवश्यक असलेली कागदपत्रे लागतात.

  • बोनाफाईट किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • वडिलांची शाळा सोडल्याचा दाखला
  • आजोबांचा शाळा सोडल्या दाखला किंवा जन्म मृत्यू दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड

महत्वपूर्ण सूचना :- स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आणि आजोबांचं शाळा सोडल्याचा दाखला यावर जातीचा उल्लेख एकसमान नसेल तर आवश्यक असलेली इतर कागदपत्रे त्यावरती तुम्हाला जोडावे लागतात. ती कागदपत्रे कोणती आहेत याची सुद्धा लिस्ट खाली दिलेली आहे.

Jaticha Dakhla Documents List
  • आधार कार्ड
  • स्वतःच जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
  • वडिलांचा जन्म शाळा सोडल्यात दाखला / वडिलांच्या जातीचा दाखला (असल्यास)
  • वडील यांचा पुरावा नसल्यास काकांचा पुरावा
  • काकांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
  • काकाच्या जातीचा दाखला (असल्यास)
  • आजोबांचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • आजोबांचा जातीचा दाखला (असल्यास)
  • आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा देखील यामध्ये चालतो.
  • चुलत आजोबा जन्म दाखला/ जातीचा दाखला
  • जर आजोबांना असेल तर पंजोबांचा पुरावा यामध्ये लागतो.
  • शाळा सोडल्यात दाखला / जन्म नोंदणीचा पुरावा आणि हक्क पत्र नोंद

ही जातीचा दाखला काढण्यासाठी पुरेशी असलेली कागदपत्रे आहेत. यामध्ये काही त्रुटी असेल किंवा काही कागदपत्रे मिसिंग असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment