Mahajyoti Free Tablet Yojana in Marathi | महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती सह भरा ऑनलाईन फॉर्म !

तुमच्यासाठी आनंदाची आनंदाची योजना घेऊन आलेलो आहे. दहावी तुम्ही पास असाल तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच Mahajyoti Free Tablet Yojana in Marathi अंतर्गत फ्री म्हणजेच मोफत टॅबलेट दिला जातो आहे. यासाठी कोणते विद्यार्थी पात्र ? यासाठी काय Eligibility ? कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत.

यावरती नोंदणी कशी करायची नियम अटी काय असतील त्याची सविस्तर माहिती खालील लेखामध्ये पाहूयात. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून एमएचटी-सीईटी, नीट, JEE करिता पूर्व परीक्षा या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत असतात.

महाज्योती मार्फत MHT-CET, NEET, JEE परीक्षा पूर्व परीक्षा प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेत असते. या प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत आणि 6GB/Day इंटरनेट डाटा असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठीची संपूर्ण माहिती खाली दिलेली कृपया माहिती वाचावी.

Mahajyoti Free Tablet Yojana in Marathi

Mahajyoti Free Tablet Yojana in Marathi Eligibility

  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा/असावी
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती, किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी
  • विद्यार्थी सन मागील वर्षी दहावीची परीक्षा पास झालेला ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • विद्यार्थी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेत असावा, प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट आणि दहावीची गुणपत्रिका अर्थात मार्कशीट जोडावे लागेल.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा, याबाबतची कागदपत्रे भविष्यात सूचनानुसार अपलोड करावी लागतील.
  • उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी

महाज्योती मोफत टॅबलेट योजनेअंतर्गत मोफत टॅब योजनेचा लाभ घेण्यासाठीची वरील पात्रता होती.

अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईट :- https://mahajyoti.org.in/

Required Documents for Mahajyoti Tablet Yojana

मोफत टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असेल तर तुम्ही मोफत टॅबलेट योजनेचा लाभ घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ? याची लिस्ट खाली दिली आहे.

  • दहावीचे गुणपत्रिका
  • अकरावी मध्ये सायन्स घेतल्याचा प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला (प्रमाणपत्र) डोमेसाईल सर्टिफिकेट
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट

महाज्योती टॅबलेट योजना नियम अटी शर्ती ?

  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक पाहून अर्ज सादर करावे
  • पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे अर्ज प्राप्त झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही
  • जाहिरात रद्द करणे, मुदत वाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे, याबाबत सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे असतील
  • अर्ज भरत असताना कोणते प्रकारच्या अडचणी असल्यास महाज्योती कॉल सेंटर संपर्क करावा
  • संपर्क क्रमांक पुढे दिला आहे :- संपर्क क्र. 0712-2870120/21 E mail ID : mahajyotijeeneet24@gmail.com
  • दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून दहावीचे गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट
  • MHT-CET, JEE, NEET या परीक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र

हे नियम व अटी शर्ती आहेत याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा :- डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे पात्रता 2024 संपूर्ण माहिती

पूर्व प्रशिक्षणाकरिता नोंदणी अर्ज कसा करावा व सूचना ?

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था या अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने व संस्थेकडून MHT-CET/NEET/JEE परीक्षेच्या मोफत ऑनलाईन पूर्वतयारीसाठी ओबीसी/ विजेएनटी/एसबीसी या सर्व संवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

यासाठी संबंधितांनी किंवा वितरणाकरिता संबंधिताने महा ज्योती या संकेतस्थळावर सूचनाफलक नोटीस बोर्ड मध्ये उपलब्ध MHT-CET/JEE/NEET ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज आहे हे सादर करावे. संकेतस्थळावर अर्थच नमुना व तपशिलावर माहिती उपलब्ध आहेत.

Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर अंतर्गत दहावीच्या आर्थिक मागास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ही मदत म्हणून दिले जाते. महाज्योती स्कीम अंतर्गत विज्ञान शाखेत प्रवेश घेणारे मुलामुलींना आणि MHT-CET/JEE/NEET या परीक्षेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी फ्री टॅबलेट वाटप केले जाते.

सहा जीबी इंटरनेट पर डे त्यामध्ये दिले जाते, अशा पद्धतीची योजना आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? मोबाईल मधून अर्ज सादर कसा करायचा आहे याचा व्हिडिओ खाली देण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

येथे क्लिक करून योजनेचा व्हिडीओ पहा आणि सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज भरून घ्या !

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

What is the Official Website of Mahajyoti Free Tablet Yojana ?

mahajyoti.org.in ही अधिकृत वेबसाईट आहेत.

महाज्योती टॅबलेट योजनेचा फुल फॉर्म काय ?

महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च & ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा फुल फॉर्म आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना कॉन्टॅक्ट नंबर ?

महाज्योती कॉल सेंटर संपर्क नंबर 0712-2870120/21 E mail ID : mahajyotijeeneet24@gmail.com ही आहेत.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment