मित्रांनो नमस्कार, Pashusavardhan Vibhag Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी भरती सुरु झालेली आहे, प्रयोगशाळा सहायक, आणि इतर पदासाठीची भरती आहे. यामध्ये पगार 20,000 रुपये दरमहा मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागात नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे.
पशुसंवर्धन विभागांतर्गत भरतीची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली आहे, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ पीडीएफ जाहिरात आणि खाली देण्यात आलेली माहिती संपूर्ण वाचून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करायचे आहेत तर कोणकोणत्या पदासाठीची भरती आहे संपूर्ण माहिती खाली पहा.
भरती विभाग : पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ही भरती राबवली जात आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहकारी या पदासाठीची भरती होत आहे.
पद संख्या : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वरील पदांसाठी भरती होत आहे, या पदासाठी किती पदसंख्या असेल या तूर्तास जाहिरात मध्ये नमूद करण्यात आलेलं नाही.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन सहकारी | पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र/ पशुवैद्यकीय जैवतंत्रज्ञान/ पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी/ पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य या विषयातील पदव्युत्तर पदवी |
प्रयोगशाळा सहाय्यक | एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी / मायक्रोबायोलॉजी मध्ये NET पात्रता आणि 2 वर्षांचा संशोधन अनुभव |
भरती कालावधी : ही पूर्णपणे तात्पुरत्या आणि कराराच्या आधारावर आहे. यासाठी 11 महिन्यांची किंवा प्रकल्प पूर्ण होणे पर्यंतची ही भरती असणार आहे याची नोंद घ्यायची अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
हे पण वाचा :- या जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या पदांवर भरती सुरू पगार 72,000 रू त्वरित अर्ज करा !
अर्ज पद्धत : वरील वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : वरिष्ठ संशोधन सहकारी 35 वर्षे, प्रयोगशाळा सहाय्यक 50 वर्षे ही असणार आहे.
नोकरी ठिकाण : पुणे महाराष्ट्र या ठिकाणी वरील पदांसाठी नोकरी ठिकाण असेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, ब्रेमेन स्क्वेअर जवळ, पुणे – 411067
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे
उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल, आणि सामील होताना फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
संचालक, ICAR-NI- FMD, पशुसंवर्धन सहायुक्त रोग अधिवेशन विभाग औंध पुणे 411067 आणि अधिसूचित केलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी किंवा न भरण्याचे सर्व अधिकार या ठिकाणी यांना असणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे, मित्रांनो ही होती पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वरिष्ठ संशोधन सहकारी, आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठीची भरती हे भरतीसाठी
मूळ पीडीएफ जाहिरात अधिकृत वेबसाईट आणि या भरती संदर्भातील अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मूळ पीडीएफ जाहिरात दिलेले आहे.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |