मित्रांनो नमस्कार, RTE Admission Process in Marathi सुरू झालेले आहेत, 2024-25 यासाठी आणि अर्ज सुरू असताना तुम्हाला कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम आणि अटी याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
आज या लेखाच्या माध्यमातून आपण RTE ऍडमिशनसाठी लागणारी कागदपत्रे, वय, नियम, अटी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) C नुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वंय अर्थसहित शाळा, खाजगी विना अनुदानित शाळा व खाजगी काय मी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते.
RTE Admission Process in Marathi
या अंतर्गत गरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ज्या शाळेमध्ये फी खूप जास्त असते अशा शाळात मोफत ऍडमिशन या ठिकाणी दिल्या जातो. असे ऍडमिशन देण्यात येणाऱ्या शाळांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात. यासाठी काही शासनाकडून नियम अटी कागदपत्रे ठरवून दिलेले आहेत कागदपत्राची पूर्तता करणारी विद्यार्थी यासाठी लाभ घेऊ शकतात.
आरटीई म्हणजे नेमकी काय आहे ?
हे तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर आरटीई म्हणजे शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकांसाठी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत अर्ज भरून त्यांना मोफत शाळेमध्ये प्रवेश दिला जातो यालाच आपण आरटीई असं म्हणतो.
आरटीई फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची लिस्ट 2024
RTE अंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आलेली आहे.
- जन्म दाखला
- जातीचा दाखला (वडिलांचा/बालकांचा)
- रहिवासी पुरावा
- उत्पन्न दाखला
- अनाथ असल्यास त्याचा पुरावा
- दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा
असे इत्यादी कागदपत्रे तुम्हाला RTE ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लागत असतात.
RTE ऑनलाईन प्रवेश मार्गदर्शक सूचना
RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी किंवा आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यांच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, त्या मार्गदर्शन सूचना काय ? त्या खालील प्रमाणे असणार आहे.
बालकांचा मोफत आणि सुट्टीच शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) C नुसार या अंतर्गत बालकांना सोय अर्थसहित शाळा तसेच विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित इथं पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रिया करिता पालकांकडून विविध अर्ज मागविण्यात येत असतात.
आर्थिक वर्षांमध्ये पालकाची वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकाला आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश मिळतो.
25% प्रक्रिया अंतर्गत विचारपूर्वक दहा शाळेची निवड करावी लागते. प्रवेश प्रक्रियेच्या विविध मुदतीमध्ये पालकांना अर्ज सादर करावा.
अर्ज करताना इंटरनेट किंवा आर्थिक अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीचे लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे असे देखील सूचना यावेळी देण्यात येत असतात.
या प्रक्रिया दरम्यान येत असलेल्या काही समस्या RTE पोर्टलवर मदत केंद्रची माहिती देण्यात आलेली आहे तिथे संपर्क साधू शकता.
हे पण वाचा :- सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना लाभ पात्रता कागदपत्रे !
पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना संपूर्ण जी काही माहिती खरी आणि न चुकता भरावी जेणेकरून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही. आणि त्यामुळे तुमचा मुलांचा किंवा मुलींचा जो काही अर्ज आहे हा रद्द होणार नाही.
पालकांनी ज्या बालकांची यापूर्वी आरटीई 25 अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
त्याचबरोबर 25% मोफत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत बालकांनी चुकीची माहिती भरून प्रवेश घेतलेले निदर्शनास आलेच तर त्याचा प्रवेश सुद्धा रद्द होतो यांचे देखील काळजी घ्यायची आहे.
अर्ज करताना एकदम खरी आणि न चुकता माहिती भरायची आहे, आणि अधिक अर्ज भरण्याची निदर्शनास म्हणजे एक अर्ज सादर करून अधिक अर्ज सादर केले असे निर्देशना झाले तर एकही अर्ज लॉटरीसाठी विचारत घेतला जात नाही. पालकांनी कोणतेही प्रकारचे कागदपत्रे अपलोड करून नयेत असे देखील अपडेट आहेत.
RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रोसेस 2024-25
RTE अंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करता येतात, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रोसेस खाली देण्यात आलेली आहे.
- सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आरटीई ऍडमिशन या अधिकृत संख्या स्थळाला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यावर न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून लॉगिन करा आणि विद्यार्थ्यांचे माहिती वडिलांची माहिती भरून घ्या.
- त्यानंतर तुमचा पत्ता म्हणजेच राहण्याचा जो पत्ता आहे तो टाकून घ्या.
- एक किलोमीटरच्या आतील शाळा तुम्हाला निवडावे लागेल.
- तुम्हाला वर देण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागेल.
- त्यानंतर सदरील तुमचा एप्लीकेशन फॉर्म भरून घ्या.
- फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे
- आता लॉटरी लागण्याची वाट पहावी लागणार आहे.
अशा पद्धतीने RTE 25% ऍडमिशन ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता. जर तुम्हाला माहिती ही समजत नसेल तर youtube वर जाऊन RTE ऍडमिशन 2024 ऑनलाइन फॉर्म असं सर्च करून तुम्ही व्हिडीओ पाहून अर्ज सादर करू शकता.
RTE ऍडमिशन ऑनलाईन अर्ज वेबसाईट
RTE फॉर्म भरत असेल तर खाली देण्यात आलेल्या लिंक वरून म्हणजेच अधिकृत वेबसाईट आहे त्यावरून तुम्ही अर्ज सादर करू शकता.
येथे करा अर्ज :- https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
RTE ऍडमिशन 2024-25 शाळांची यादी कशी पहावी ?
आरटी 25% मध्ये बसणाऱ्या शाळांची यादी तुम्ही ऑनलाईन शोधू शकता, ऑनलाइन आरटीई ऍडमिशनच्या अधिकृत वेबसाईट वर शाळांची यादी कशी शोधायची यासाठी खालील माहिती वाचावी.
- सर्वप्रथम RTE ऍडमिशन 2024-25 अधिकृत वेबसाईट वरती या.
- त्या ठिकाणी लिस्ट ऑफ स्कूल (Along with Approved Fee) हा पर्याय दिसून येईल त्यावर क्लिक करा.
- नंतर तुमचा जिल्हा निवडा, नंतर तुम्ही दोन पद्धतीने सर्च करू शकता.
- 1) तुमचा ब्लॉक म्हणजे तालुक्याचे नाव नुसार
- 2) शाळेच्या नावानुसार
- जो योग्य पर्याय वाटेल तो निवडा आणि त्यानंतर ऑल किंवा RTE मधून एक पर्याय निवडा.
- स्कूल अकॅडमी year निवडून सर्व शाळांची यादी तुम्हाला मिळते.
शा पद्धतीने तुम्ही आरटीई ऍडमिशन 2024-25 अंतर्गत येणाऱ्या शाळांची यादी शोधू शकता.
RTE अर्ज स्थिती 2024-25 कशी चेक करावी ?
- अर्ज स्थिती चेक करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर एप्लीकेशन वाईज डिटेल्स या पर्यावर Click करा
- अर्ज करताना जो काही अप्लिकेशन नंबर मिळाला तो टाका
- Go Button वर क्लिक करा तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल.
RTE 25% ऍडमिशन ऑनलाईन प्रवेशासाठी कोणते बालके पात्र ?
आरटीई ऍडमिशनसाठी कोणते मुलं-मुली पात्र ? यासाठी आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये आहे अशा पालकांची बालके, वंचित घटाकाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यासाठी पात्र आहेत.
RTE ऍडमिशन वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटांमध्ये कोणत्या बालकांचा समावेश ?
वंचित गटामध्ये :- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि दिव्यांग बालके व्यतिरिक्त वि.जा (अ), भटक्या जमाती ब, क, ड, इतर मागासवर्ग, ओबीसी विशेष मागासवर्ग (SBC) ही येतात.
दुर्बल गटांमध्ये :- या बालकांच्या पालकांचे ज्या बालकांचे पालनपोषण करणारे व्यक्तीचे उत्पन्न हे 1 लाखाच्या आत आहे, असे बालकांचा यात समावेश होतो. आणि त्याचबरोबर या SEBC प्रवर्गाच्या बालकांना (आर्थिक दुर्बल एक लाख पेक्षा कमी उत्पन्न) असलेल्या गटामधून प्रवेश अर्ज भरता येतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
RTE 25% Full Form ?
Rights to Education Act 25 हा आहेत.
RTE 25% ऍडमिशन 2024 25 शेवटची तारीख ?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 होती. परंतु आता मुदत वाढवून 10 मे 2024 करण्यात आली आहेत.
RTE 25% अंतर्गत कोणती बालके पात्र असतात ?
आर्थिक दुर्बल गटातील एक लाखापेक्षा आत वार्षिक उत्पन्न असलेले व अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकातील मुले-मुली पात्र असते.