तुम्ही शिक्षण घेत असाल तर शिक्षण घेण्यासाठी पैशाची अडचणी येत असेल किंवा तुमचं शिक्षण हे पैशाअभावी होत नसेल तर तुमच्यासाठी आज अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्ती अर्थात स्कॉलरशिपची माहिती घेऊन आलेलो आहे.
या स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला 3 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळून तुम्ही तुमचं शिक्षण हे पूर्ण करू शकता। यामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
आज Savitribai Phule Shishyavrutti Yojana इयत्ता पाचवी ते दहावी या योजनेची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते.
सर्वात अगोदर मागासवर्गीय समाजातील मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी पाचवी ते सातवीतील मुलींसाठी 1995-96 पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू करण्यात आली होती.
याच पाठोपाठ आता आठवी ते दहावी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टीने 2003-04 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता.
योजनेचे नाव | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |
योजनेची सुरुवात | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) |
योजनेतून लाभ | 1000 हजार पर्यंत |
योजनेचा उद्देश | मुलींचे शिक्षण व जीवनमान उंचावणे |
लाभार्थी पात्रता | 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या गरीब कुटुंबातील मुली |
ऑनलाईन अर्ज | महाडीबीटी पोर्टल |
अधिकृत वेबसाईट | महाडीबीटी पोर्टल |
Savitribai Phule Shishyavrutti Yojana Details
या अंतर्गत आता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येकी शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असेल दर महिना 100₹ रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळू शकते.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थ्यांना दरमहा 100₹ रुपये मिळणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माहिती आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे ही वाचा :- डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे पात्रता 2024 संपूर्ण माहिती
सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना नियम अटी पात्रता
- उत्पन्न आणि गुणाची अट नाही
- शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याबाबतचे अर्ज ऑनलाईन भरावे
- 75% उपस्थित असल्यास शाळेने प्रस्तावित कालावधीत सादर करावा
- लाभधारक मुलगी शासनामान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी
- सदर शिष्यवृत्ती रक्कम मुलीच्या बँकेतील खात्यामध्ये ऑनलाईन जमा करण्यात येत असते.
सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना महत्वाची माहिती
महाराष्ट्र राज्य मधील 5वी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र प्रवर्गाच्या कुटुंबातील विद्यार्थींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली.
या माध्यमातून अनेक मुलींचे शिक्षण पूर्ण होत आहे, शैक्षणिक गुणवत्ता असून देखील शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्देश देखील आहे.
राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे हा प्रमुख योजनेचा उद्देश.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे या योजनेचा उद्देश आहे.
योजनेअंतर्गत मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे आहे.
मुलींचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी या ठिकाणी ही योजना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुलींना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी योजना सुरू आहे.
समाजात मुलीबद्दलचे असणारे नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करणे या योजनेचा उद्देश आहे. मुलीच्या शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची संधी प्रदान करणे.
Benefit of Savitribai Phule Scholarship Scheme
- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देशाने योजना सुरू केलेली आहे.
- राज्यांमध्ये होत असलेल्या भ्रूणहत्या हत्या थांबवणे योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- तसेच राज्यात मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढवणे हा देखील आहे.
- मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिकसहाय्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबामध्ये मुलींच्या आई वडिलांना मुलीच्या शिक्षणासाठी पैशांची कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सावित्रीबाई फुले ही योजना सुरू करण्यात आली.
- मुलींना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पुढील भविष्य सुरक्षित करणे हा देखील आहे.
अशा पद्धतीने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मॅट्रिक पूर्व योजना जे आहेत. या योजनेचे उद्देश आपण आत्ता जाणून घेतलेले आहेत. आता योजनेचे वैशिष्ट्ये आणि इतर पात्रता काय आहे हे खाली दिलेलं आहे ते तुम्ही वाचावे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्य 2024 महाराष्ट्र
- सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विजाभज तसेच विमाप्र प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मॅट्रिक पूर्व योजना सुरू करण्यात आली.
- या योजनेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमध्ये सुरुवात करण्यात आली.
- शिक्षणासाठी अर्थसाह्यय देऊन मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त आत्मनिर्भर बनवण्यासाठी योजना सुरू आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहेत, जेणेकरून अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभारती विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट ट्रान्सफर ही केली जात असते.
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज करताना घ्यावयाची काळजी ?
- या शिष्यवृत्ती अथवा अर्थसहाय्य योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार नियम अटीच्या पूर्तता करीत असलेल्या विद्यार्थिनींनीच अर्ज करावेत.
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनाचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थिनीना सदर योजना लागू राहणार नाही.
- त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करू नये.
- या शिष्यवृत्ती योजनेत फक्त मुलींसाठी असून मुलांना अर्ज करता येणार नाही
- विद्यार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज करतानी अर्ज आणि जी काही संपूर्ण माहिती आहे ती भरून योग्य ती कागदपत्रे सादर करावीत.
- अर्जदार विद्यार्थ्यांनीचे फक्त राष्ट्रीकृत बँकेतच बचत खाते असावे, आणि ते सुद्धा आधार लिंक असणं गरजेचं
- विद्यार्थीनीने बँकेची माहिती भरताना स्वतःचे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचे अद्यावत माहिती अर्जामध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे.
- पालकाची अथवा इतर व्यक्तीचे बँक खाते शिष्यवृत्तीसाठी विचारात घेतले जात नाही याची नोंद घ्यावयाची आहे.
- ऑनलाईन अर्ज सोबत विद्यार्थीनीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी इतर कोणतेही कागदपत्रे अपलोड करू नयेत. याची सर्वांनी मुलींनी नोंद घ्यायची आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लाभार्थी पात्रता 2024
पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मुलींना किती अर्थसहाय्य किंवा शिष्यवृत्ती मिळते 2024 ?
- या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनी दरमहा 60 रुपये, 10 महिने करिता 600 रुपये शिष्यवृत्तीचे रक्कम मिळते.
- आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनी शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने दरमहा 100 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
- शिष्यवृत्ती पाचवी ते सातवी दरमहा साठ रुपये याप्रमाणे दहा महिन्यासाठी 600 रुपये मिळते.
- आठवी ते दहावी प्रति महिना 100 रुपये याप्रमाणे दहा महिन्याचे 1000 रुपये रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात डीबीटी द्वारे मुलीच्या बँक खात्यात जमा होते.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कोणत्या प्रवर्गांसाठी लागू 2024
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना विमुक्त जाती / भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी म्हणजेच फक्त मुलींसाठी लागू आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावयाची आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत महत्त्वाच्या बाबी ?
या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित, आणि विनाअनुदानित माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी लागू आहे.
प्रायव्हेट शाळेत मुली शिकत असते तर त्यांना लाभ मिळणार नाही. या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत उत्पन्नाची अट नाही विद्यार्थीनीचे शाळेतील उपस्थिती नेहमीच असणे आवश्यक, उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती
अर्थात स्कॉलरशिपचा लाभ मिळणार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थीनीचे अर्ज भरून घेतील त्यामुळे मुलींना तसेच पालकांना कुठल्या सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अटी आणि शर्ती महाराष्ट्र 2024 ?
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ लाभ घ्यावयाचा असेल तर महाराष्ट्र राज्यातील मुलीच यासाठी पात्र असतील.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील मुलींना लाभ मिळणार नाही
- विद्यार्थी इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिकणारी असावी.
- अर्जदार विद्यार्थीनीने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या शिष्यवृत्ती चा लाभ घेतला असेल अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थिनीने कोणतीही खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला असेल किंवा मिळवायचं असेल तर अशा परिस्थितीत तिला योजनेमधून रद्द आणि कारवाई त्यावरती केली जाते.
- या योजनेत फक्त मुलींनाच लाभ मिळतो, मुलांना योजनेत लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थिनी ही विजाभज, विमाप्र या प्रवर्गातील असणं आवश्यक
- अर्जदार विद्यार्थीनीचे आई किंवा वडील एखाद्या सरकारी सेवेत कार्यरत असेल तर त्या विद्यार्थिनी योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थीनी शासनमान्य शाळेत नियमित शिकणारी असणं आवश्यक.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- इमेल आयडी
- राष्ट्रीयकृत बँकेचे बँक खाते
- मोबाईल नंबर
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- उत्त्पन्न दाखला
- मागील वर्गाचे अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
- शपत पत्र
- इत्यादी कागदपत्रे लागेल
सावित्रीबाई फुले शिवेश्यावृत्ती योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
How to Apply Online Savitribai Phule Scholarship Scheme
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे. यावर सर्व योजना शिष्यवृत्ती या उपलब्ध आहेत.
- आता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्री मॅट्रिक्स स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी पाचवी ते दहावीचे जे काही विद्यार्थिनी आहेत यासाठी पात्र आहेत.
- आता तुम्हाला यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी लागेल.
- त्या ठिकाणी गेल्यानंतर प्री मॅट्रिक्स स्कॉलरशिप या पर्यायावर क्लिक करून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना यावर क्लिक करून घ्या.
- त्या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचायचे आणि त्या नंतर ऑनलाईन अप्लाय पर्याय दिसेल त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन नोंदणी करून घ्या.
- ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा आहे.
ऑनलाइन अर्ज सादर कसा करावा या संबंधित व्हिडिओ यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल, तुम्ही youtube वर तो व्हिडिओ शोधू शकतात. अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा खाली देण्यात आलेली आहे धन्यवाद.