Talathi Bharti Sampurn Mahiti | तलाठी भरती अभ्यासक्रम, आवश्यक कागदपत्रे लिस्ट संपूर्ण माहिती मराठीत जाणून घ्या !

Talathi Bharti Sampurn Mahiti ची तयारी तुम्ही करत असाल तर तलाठी भरतीची तयारी करत असताना तलाठी भरतीचा अभ्यासक्रम कसा आहे त्याचबरोबर तलाठी भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? यासाठी कोण पात्र असतो. तलाठी भरती संदर्भातील सविस्तर संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

तलाठी भरतीच्या अभ्यासक्रम मराठी संपूर्ण माहिती तलाठी परीक्षेच्या तयारीसाठी तलाठी भरती अभ्यासक्रम हा प्रकाशित झालेला आहे. तुम्हाला माहितीच आहे की 2023 मध्ये तलाठी भरती ही जारी झाली होती.

याचा नवीनतम-नवीन अभ्यासक्रम खाली देण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम अद्यावत असलेला अभ्यासक्रम तुम्ही वाचून घ्या. त्या पद्धतीने भरतीची तयारी करू शकतात, आता तलाठी भरती अभ्यासक्रम मराठीत ही संपूर्ण माहिती खाली दिली आहे नक्की तुम्ही वाचून घ्यावी.

तलाठी ही वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप आणि विषय खालील तक्त्यात दिले आहेत.

Talathi Bharti Sampurn Mahiti

तलाठी भरती परीक्षा मध्ये 4 विषय असतात, आणि त्यामध्ये विषय, प्रश्नांची संख्या, गुण हे दिले असतात, आणि याचा तक्ता खालील प्रमाणे आहे.

  • मराठी भाषा 25 प्रश्न 50 गुण
  • इंग्रजी भाषा 25 प्रश्न 50 गुण
  • सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण
  • बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण
  • 100 प्रश्न आणि 200 गुण

तलाठी भरती संदर्भात महत्त्वाचे ठळक आणि कामाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

  • तलाठी भरती परीक्षा ही TCS मार्फत ऑनलाईन घेतली जाते.
  • तलाठी परीक्षेत 100 प्रश्न आणि 200 गुण
  • परीक्षेत नकारात्मक गुण (नेगेटिव्ह मार्किंग) नसते
  • परीक्षेचा कालावधी 2 तास
  • प्रश्नपत्रिकेचे दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शाळा परीक्षेच्या बारावीच्या दर्जाचा समान असतो.
  • बाकी सर्व विषयांसाठी प्रश्नपत्रिका दर्जा पदवीच्या दर्जासमान असतो.

तलाठी भरती अभ्यासक्रम तपशील

इंग्लिश भाषा :- Grammar, Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tennis, Voice, Narration, Article, Questions Tag, Vocabulary, (use of idioms and Phrases and their meaning, Expression) Fill in the blanks in the sentence. Simple Sentence structure (Error, types of sentence)

हे पण वाचा :- या छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप योजनेतून 9वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांना 9600 रुपये !

मराठी भाषा :- मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द). म्हणी व वाक्यप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक

सामान्य ज्ञान :- इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम – 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न आणि इतर असलेले टॉपिक यामध्ये कवर)

बौद्धिक चाचणी :- बुद्धिमत्ता – अंकमालिका, अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समान संबंध, अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती

अंकगणित :- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे जसे की सरासरी नफा, तोटा, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी

वरील माहिती मध्ये तलाठी भरती संदर्भातील संपूर्ण अभ्यासक्रम गुणासह आणि तपशील सोबत जाणून घेतला आहे. तलाठी भरतीचे थोडक्यात माहिती पहिली आहेत. आता तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? शैक्षणिक पात्रता काय आहे हे आपण जाणून घेऊया.

तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे लिस्ट

  • आधार कार्ड
  • दहावी मार्कशीट
  • बारावी मार्कशीट
  • पदवीधर असल्याचे मार्कशीट (पदवी कोणतेही शाखेतील)
  • MS-CIT सर्टिफिकेट
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही (Signature)
  • ईमेल आयडी (E-mail ID)
  • मोबाईल नंबर

या भरतीसाठी शाळा सोडल्या दाखला दहावी-बारावी तसेच पदवी आणि त्याचबरोबर बारावीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट पदवी प्रमाणपत्र पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे प्रमाणपत्र तसेच एनएसएस किंवा एनसीसी प्रमाणपत्रे केले असेल तरच लागेल. महाराष्ट्र रहिवासी दाखला अर्थात वय आदिवासी सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, जातीचा दाखला असे विविध कागदपत्रे लागत असतात. तसेच कास्ट व्हॅलिडीटी प्रमाणपत्र आणि इत्यादी जे काही कास्ट सर्टिफिकेट दाखवणारे कागद आहेत ते या ठिकाणी लागू आहेत. महिलांना आरक्षण प्रमाणपत्र (महिलांना लाभ असल्यास)

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment