वन विभागाअंतर्गत 10वी 12वी व पदवीधरांना नोकरीची संधी पगार 25 हजार रुपये भरा फॉर्म ! Van Vibhag Bharti Nagpur 2024

Van Vibhag Bharti Nagpur 2024 अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहे. पगार 25 हजार रुपयापर्यंत मिळणार आहे, वन विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे.

या ठिकाणी पाहायला गेलं तर पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत.

मात्र इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात, यासाठी पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, मूळ पीडीएफ जाहिरात,

अर्ज पद्धत, निवड प्रक्रिया, भरती कालावधी, नोकरी ठिकाण, मुलाखतीचे दिनांक, अर्ज पाठविण्याचा पत्ता, आणि इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

भरती विभाग : अप्पर प्राधान्य मुख्य वनरक्षक (वन्यजीव) कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान

पदाचे नाव : प्राणी प्रकल्प व्यवस्थापक, गडद आकाश समन्वयक, कुत्रा हाताळणारा, आग नियंत्रण व्यवस्थापक, आग नियंत्रण ऑपरेशन, महावत

पद संख्या : एकूण 12 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : प्राणी प्रकल्प व्यवस्थापक : बारावी पास संगणक व टायपिंगचे अनुभव आवश्यक गडद आकाश समन्वयक : बारावी पास व संगणकाचे ज्ञान आवश्यक कुत्रा हाताळणारा : किमान बारावी उत्तीर्ण असावा मराठी भाषेत ज्ञान असणे आवश्यक आग नियंत्रण व्यवस्थापक : बीएससी, बी-टेक, BE मध्ये संगणकाची पदवी मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आग नियंत्रण ऑपरेशन : बारावी पास, एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण महावत : किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

पगार/ वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार रुपये दरमहा वेतन

अर्जाची पद्धत : ऑफलाईन

ही भरती वाचा : 12 वी पदवीधर उमेदवारांना शेतकरी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदाची भरती भरा फॉर्म !

निवड प्रक्रिया : थेट मुलाखती द्वारे

भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीवर

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे दिनांक : 14 & 18 जून पर्यंत राहील

अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि मुलाखतीचा पत्ता : अमलतास पर्यटन संकुल सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प पूर्व पेंच पिपरीया या ठिकाणी अर्ज आणि मुलाखतीस हजर राहावे.

भरती सूचना : उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता येताना परिपूर्ण बायोडाटा, अर्ज व शैक्षणिक अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्तऐवज प्रमाणपत्र सह खालील दिलेल्या नमूद पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखती करिता उपस्थित राहणे आवश्यक, निवड झालेल्या उमेदवारास वरील तक्त्यात दर्शविलेल्या मुख्यालय ठिकाणी काम करावे लागेल.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

त्याचबरोबर त्यांचे व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर पद भरती ही कंत्राटी पद्धतीने आहे. या पदाकरिता बायोडाटा व अर्ज एप्लीकेशन तसेच वरील प्रमाणे शैक्षणिक अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्तावेज मुलाखतीच वेळेस दाखवण्यात यावे. नियुक्त झालेल्या कंत्राटी पद 24 तास सेवा करिता तत्पर आणि बंधनकारक राहील.

त्याचबरोबर असे इतर या ठिकाणी अटी शर्ती आहे, अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचा आज वनविभाग अंतर्गत म्हणजेच पेंच व्याघ्र संवर्धन अंतर्गत होत असलेल्या या पदासाठीची भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्ज सादर करा व मुलाखती हजर रहावे.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment